नोटबंदीच्या निर्णयावर 'राज' कडाडले


  • नोटबंदीच्या निर्णयावर 'राज' कडाडले
SHARE

दादर - 1000-500 रुपयांच्या नोटाबंदीच्या निर्णयावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मोदी सरकारवर जोरदार टीका केलीय. नोटाबंदी झाल्यानंतर रोज रोज नवीन आदेश कसे काय निघतात, त्याचबरोबर घरात उंदीर झाले तर अख्ख घर जाळणार का? नवीन नोटांवर गव्हर्नरची सही कशी? तसेच जिल्हा बँकेचा निर्णय नेमका कुणाचा असे एक ना अनेक सवाल करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदींच्या नोट बदलीच्या निर्णयाचा खरपूस समाचार घेतला. मोदींनी आपल्या भाषणात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं बोट धरून आपण राजकारणात आल्याचं म्हटलं होतं. याचीही राज ठाकरेंनी खिल्ली उडवली. राज ठाकरे म्हणालेत अजित पवारही शरद पवारांचं बोट धरून राजकारणात आलेत मग नेमकं तुमचं बोट कोणतं असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. मनसे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राज ठाकरे यांनी नोट बंदीच्या निर्णयावर जोरदार टीका केली.

संबंधित विषय
ताज्या बातम्या