
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
“अहो कधीतरी आमच्याही छकुल्या म्हणजेच (मोदी यांच्या योजनां)चं कौतुक करा ना” असं पंतप्रधान मोदी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना म्हणत आहेत, तर “मोदीजी, नक्की केलं असतं पण त्यात नुसताच पेंढा भरलाय, असं उत्तर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग देत आहेत, असं व्यंगचित्र राज ठाकरे यांनी रेखाटलं आहे.
राज ठाकरे यांनी आपल्या कुंचल्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर फटकारे ओढले आहेत. राज यांनी पंतप्रधान मोदी हे एक बाबा गाडीत ''मोदींच्या योजना” घेवून पुढे जात असल्याचं रेखाटलं आहे. तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या पाठीशी भाजपाध्यक्ष अमित शाह आपल्या शबनममध्ये “जुमला” घेवून पाठराखण करत असल्याचं रेखाटून या योजनांना जाहिरातबाजी असं संबोधलं आहे.
देशाने जी प्रगती केली, त्याचे सर्व श्रेय आजवरच्या सरकारला जाते, हे मी अभिमानाने कबूल करतो. तसे मी लाल किल्ल्यावरूनही सांगितलं. पण तेवढा उदारपणा तुम्ही कधी दाखवला का? असं नरेंद्र मोदी म्हणत असतानाच, “अहो कधीतरी आमच्याही छकुल्याचं (मोदी यांच्या योजनां)चं कौतुक करा ना” असं पंतप्रधान मोदी हे माजी पंतप्रधान यांना म्हणत आहेत, तर “मोदीजी, नक्की केलं असतं पण त्यात नुसताच पेंढा भरलाय, असं उत्तर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग देत आहेत, असं व्यंगचित्र रेखाटून राज ठाकरे यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.
