Advertisement

भिडेंच्या आंबरसाला राजचा व्यंगचित्रातून टोला


भिडेंच्या आंबरसाला राजचा व्यंगचित्रातून टोला
SHARES


माझ्या शेतातील आंबा खाल्ल्याने जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते, या संभाजी भिडे यांच्या वक्तव्याने राज्यात वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या अाहेत. या वक्तव्याचा राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्राच्या माध्यमातून खरपूस समाचार घेतला आहे.


पहिलं व्यंगचित्र

दोन महिला दाखवल्या आहेत. एका महिलेच्या कमरेवर बाळ आहे, या बाळाच्या चेहऱ्याऐवजी राज यांनी आंबा दाखवला आहे. या बाळाला पाहून दुसरी महिला 'अय्या ! भिडेंच्या बागेतून वाटतं,' असं म्हणत असल्याचं व्यंगचित्र राज यांनी रेखाटलं आहे.


आयत्या बळावर

स्पर्धा परीक्षेऐवजी कंत्राटी पद्धतीने अधिकारी भरतीवर राजने निशाणा साधला आहे. एक अायएएस अधिकारी खाली मान घालून अभ्यास करतो. तर उद्योगपतीधार्जिना बाहेरील माणूस या अधिकाऱ्यांच्या पाठीवर हात ठेवून नरेंद्र मोदींच्या हातातील फुलांची माळ गळ्यात टाकून घेण्यासाठी पुढे सरसावत आहे. तर मोदींमागे अमित शहा आणि उद्योगपती त्याला छान असल्याचे अविर्भाव दाखवत आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यांच्या व्यंगचित्रातून सरकारचा, त्यांच्या धोरणांचा चांगलाच समाचार घेत आहेत. लोक नुसती पसंती देत नाही तर ते सोशल मीडियावर व्हायरलदेखील करताना दिसत आहे.



हेही वाचा -

आणीबाणीत कारावास भोगलेल्यांना पेन्शन - महसूलमंत्री चंद्रकांत पाटील

फुलेंच्या पगडीचा विरोध शिवसेनेनं जाहीर करावा – नवाब मलिक





संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा