राज ठाकरेंनी केले कर्जमाफीच्या निर्णयाचे स्वागत

  Dadar
  राज ठाकरेंनी केले कर्जमाफीच्या निर्णयाचे स्वागत
  मुंबई  -  

  सधन शेतकऱ्यांना वगळून सरसकट कर्जमाफी देण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाचे मनसेने स्वागत केले आहे. शेतकऱ्यांच्या बाकीच्या मागण्या मान्य व्हायच्या शिल्लक असल्या, तरी या गोष्टींचे स्वागत केलेच पाहिजे. अर्थात आम्हाला 'कर्जमाफी' हा शब्द मान्य नसला, तरी शब्दछल करण्याची ही वेळ नाही. आम्हाला संपूर्ण कर्जमुक्ती अपेक्षित आहे, असे परिपत्रक राज ठाकरे यांच्या कार्यालयातून सोमवारी प्रसिद्ध करण्यात आले आहे.

  राज्य सरकारने त्यांच्या निर्णयाचा तपशील जाहीर करावा, कारण त्यानंतर शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होणार नाहीत आणि त्यांच्यावर अन्याय होणार नाही याची सरकारने काळजी घेतली पाहिजे, असेही या पत्रात म्हटले आहे.

  मनसेचे कार्यकर्ते या निर्णयाची अंमलबजावणी कशी होत आहे, यावर लक्ष ठेवतील आणि जिथे जिथे अन्याय होताना दिसेल, तिथे शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लढतील, असेही राज ठाकरे यांनी या पत्रकात म्हटले आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.