Advertisement

गिरणी कामगारांचं झालं, ते शेतकऱ्यांचं होऊ नये - राज ठाकरे


गिरणी कामगारांचं झालं, ते शेतकऱ्यांचं होऊ नये - राज ठाकरे
SHARES

''शेतकऱ्यांचा राग मी समजू शकतो, मात्र जे गिरणी कामगारांचं झालं ते शेतकऱ्यांचं होऊ नये. सरकार आता म्हणतं, कर्जमाफीसाठी पैसे नाहीत, विरोधात असताना हे माहीत नव्हतं का? मुंबईत भाज्यांचे दर वाढले आहेत. शेतकऱ्यांना सरकारकडून कोणतंही ठोस आश्वासन देण्यात आलेलं नाही. सरकारकडून शेतकरी आणि जनतेची फसवणूक होत आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पक्षाचं लेबल का लावताय? शेतकऱ्यांच्या भावनेला माझा पाठिंबा आहे. मी शेतकऱ्यांसोबत कायमच आहे'', अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. ते शुक्रवारी कृष्णकुंज येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आरक्षणासाठी निघालेल्या मोर्च्यांचं पुढं काय झालं?
राज पुढे म्हणाले, भाजपाचं सरकार, कामगिरी दमदार' असं म्हणत भाजपा सत्तेत आली खरी. पण मागच्या तीन वर्षांत सरकारच्या कामगिरीवर जनता नाराज नाराज असल्याचं चित्र राज्यभर पाहायला मिळत आहे. हे सरकार खोटं बोलून सत्तेवर आलं आहे. मराठा आरक्षणासाठीही मोर्चे निघाले, त्यांचं पुढे काय झालं?, आपल्याकडे तोडगे निघत नाहीत. अण्णा हजारे मध्यस्थी करत असतील, तर करावं, पण प्रश्न सोडवावा, ते महत्त्वाचं आहे. या सरकारने निवडणुकीआधी आणि सत्तेत आल्यानंतरही घोषणा दिल्या. पण यांच्याकडे पैसे आहेत का? आज जय जवान, जय किसान दोघेही मरत आहेत.

शिवसेना सत्तेत अंडी उबवत बसलीय का? -
शिवसेना सत्तेत फक्त अंडी उबवत बसलीय का? शिवसेनेला स्वतःची ठोस भूमिकाच नाही, अशी टीकाही राज यांनी केली. प्रत्येक विषयावर फक्त अभ्यास करायचा असेल, तर त्यांनी शाळेत जायला पाहिजे, सरकार चालवू नये, असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा