Advertisement

भाजपच्या 'त्या' पत्रामुळे राज्यसभेची मतमोजणी रखडली

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मतमोजणीला अद्याप परवानगी मिळालेली नाही.

भाजपच्या 'त्या' पत्रामुळे राज्यसभेची मतमोजणी रखडली
SHARES

राज्यसभेच्या सात जागांसाठी आज मतदान पार पडलं. सर्व आमदारांनी आज मतदान केलं. पण अद्याप मतमोजणीला सुरुवात झाली नाही. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीचा निकास रखडला आहे. सर्व आमदारांच्या मतदानानंतर संध्याकाळी पाच वाजता मतमोजणीला सुरुवात होणं अपेक्षित होतं. पण अजूनही मतमोजणीला सुरुवात झाली नाही.

भाजपने आज झालेल्या मतदानाच्या प्रक्रियेत तीन आमदारांच्या मतदानावर आक्षेप घेतला आहे. भाजपने याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं आहे. पण केंद्रीय निवडणूक आयोगाकडून या हरकतींवर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

आम्ही तुम्हाला कळवू इच्छितो की सर्व श्रीमती. यशोमती ठाकूर आमदार, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आमदार, राष्ट्रवादीचे श्री जितेंद्र आव्हाड आणि शिवसेनेचे श्री सुहास कांदे आणि या निवडणुकीत मतदारांनी त्यांच्या स्वतःच्या पक्षाच्या निवडणूक प्रतिनिधींशिवाय इतर व्यक्तींना त्यांची मतपत्रिका उघडपणे दाखवून मतदान प्रक्रियेत तडजोड केली आणि उल्लंघन केले, असे आरोप पत्राद्वारे करण्यात आले आहेत.

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मतमोजणीला अद्याप परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे मतमोजणी रखडली आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने भाजपच्या पत्राची दखल घेतल्याचं मानलं जात आहे.

भाजपने राज्याच्या बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्या मतांवर आक्षेप घेतला आहे. भाजपने केंद्रीय निवडणूक आयोगाला याबाबत पत्र पाठवत आपला आक्षेप नोंदवला आहे.

तसेच मतमोजणीत तीन मतं बाद करा, अशा आशयाचं पत्र भाजपने पाठवलं आहे. या पत्रामुळे मतमोजणी रखडली आहे. विशेष म्हणजे मतदानावार हरकत ही महाविकास आघाडीकडूनही घेण्यात आली आहे. महाविकास आघाडीकडून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या मतांवर आक्षेप नोंदवण्यात आला आहे.



हेही वाचा

राज्यसभा निवडणुका - अनिल देशमुख, नवाब मलिकांना मतदानाची परवानगी नाकारली

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा