Advertisement

राज्यसभा निवडणुका - अनिल देशमुख, नवाब मलिकांना मतदानाची परवानगी नाकारली

मुंबई सत्र न्यायालयाने दोन्ही नेत्यांना मतदान करण्याची परवानगी दिली नाही

राज्यसभा निवडणुका - अनिल देशमुख, नवाब मलिकांना मतदानाची परवानगी नाकारली
SHARES

राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Election 2022 सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात आहेत. मात्र, सत्ताधारी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन आमदार हे अटकेत आहेत. त्यामुळे या आमदारांनाही निवडणुकीत मतदान करण्याची परवानगी मिळावी यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर नुकतीच मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी झाली.

सुनावणी दरम्यान न्यायालयाने अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदान करण्याची परवानगी नाकारली आहे. अनिल देशमुख आणि नवाब मलिकांना परवानगी नाकारल्याने महाविकास आघाडीसाठी हा एक मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे.

नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जाला ईडीने विरोध दर्शवला. कैद्यांना मतदानाचा अधिकारच नसल्याचा दावाही ईडीने न्यायालयात केला.

बुधवारी (8 जून) दिवसभराच्या युक्तिवादानंतर मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टानं आपला निकाल राखून ठेवला होता. त्यानंतर गुरुवारी न्यायाधीशांनी आपला निर्णय दिला आहे.



हेही वाचा

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा