Advertisement

सचिन तेंडुलकरची राज्यसभेतली इनिंग संपली!


सचिन तेंडुलकरची राज्यसभेतली इनिंग संपली!
SHARES

गेल्या ६ वर्षांपासून राज्यसभेचा नियुक्त सभासद असलेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आता राज्यसभेत दिसणार नाही. कारण राज्यसभेतून ४० खासदारांचा कार्यकाल संपुष्टात येत आहे. त्यात मुंबईकर सचिन तेंडुलकरचाही समावेश आहे! सचिन तेंडुलकरसोबतच हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रेखाही या सत्रातच आपला ६ वर्षांचा कार्यकाल पूर्ण करत आहेत.


राज्यसभेतली कामगिरी निराशाजनक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सर्व खासदारांना शुभेच्छा देत निरोप दिला. सचिन तेंडुलकरवर राज्यसभेत भूमिका न मांडल्यावरून विरोधकांनी मोठ्या प्रमाणावर टीका केली होती. तसेच, त्याला एकदा न बोलू दिल्याबद्दल सचिनने सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करणारा व्हिडिओही शेअर केला होता. मात्र, याव्यतिरिक्त सचिनची राज्यसभेतली कामगिरी विशेष उल्लेखनीय ठरली नाही.



४० खासदारांचा कार्यकाळ संपुष्टात

राज्यसभेतील १२ सदस्य हे राष्ट्रपतींच्या मंजुरीने नियुक्त केले जातात. त्यातल्या चार सदस्यांचा कार्यकाळ संसदेच्या याच अधिवेशनादरम्यान संपुष्टात येत आहे, ज्यामध्ये सचिन आणि रेखा यांचा समावेश आहे. एकूण ४० खासदारांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. २०१२मध्ये सचिन आणि रेखा यांना राज्यसभेवर नियुक्त करण्यात आले होते.



हेही वाचा

लोकलच्या सुखकर प्रवासासाठी सचिन तेंडुलकरचा पुढाकार


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा