राज्यस्तरीय अभिवादन महारॅली

 BMC office building
राज्यस्तरीय अभिवादन महारॅली
राज्यस्तरीय अभिवादन महारॅली
See all

परळ - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 60 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बहुजन मुक्ती पक्षाच्या वतीनं परळ पूर्व येथील सदाकांत ढवण मैदानात 6 डिसेंबरला राज्यस्तरीय अभिवादन महारॅलीचं आयोजन करण्यात आलं. या महारॅलीचं उद्घाटन ज्येष्ठ रिपब्लिकन नेते विजय वाघचौरे यांच्या हस्ते करण्यात आलं.

'बहुजन मुक्ती पक्ष ही तळागाळातील दुर्लक्षित आणि दिन दुबळ्या नागरिकांना न्याय मिळवून देणारी एकमेव पार्टी आहे, त्यामुळे आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकत्रित राहून एकजुटीने कार्य करण्याची गरज आहे, तरच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची हत्या करणाऱ्या दोषींना शिक्षा मिळेल'. असं मत बमुपाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी मांडलं. समाजात दीर्घजीवी सत्ता हवी, कुणालाही न्याय मिळवून न देणाऱ्या सत्तेसोबत राहण्याची आवश्यकता नाही असंही बाळासाहेब पाटील म्हणाले. या वेळी राष्ट्रीय अध्यक्ष व्ही. एस. मातंग, राष्ट्रीय कार्याध्यक्ष अॅड. जे. एस. कश्यप, राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेश पाटील, अॅड. सुमिता पाटील, डॉ. अजीमुद्दीन, मौलाना खान आदी मान्यवर उपस्थित होते.

Loading Comments