• ओम क्रिएशन ट्रस्टला रामदास आठवलेंची भेट
  • ओम क्रिएशन ट्रस्टला रामदास आठवलेंची भेट
  • ओम क्रिएशन ट्रस्टला रामदास आठवलेंची भेट
  • ओम क्रिएशन ट्रस्टला रामदास आठवलेंची भेट
SHARE

महालक्ष्मी - राष्ट्रीय कन्या दिनानिमित्त सोमवारी आनंद निकेतन येथील ओम क्रिएशन ट्रस्टला केंद्रीय समाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी भेट दिली. ओम क्रिएशन संस्थेच्या वतीने दरवर्षी २४ जानेवारीला राष्ट्रीय कन्या दिन साजरा केला जातो. ही संस्था महिलांना सक्षम बनवण्यासाठी काम करते. तसेच समाजातील विकलांग महिलांसाठी ही संस्था काम करते. या कार्यक्रमादरम्यान रामदास आठवले यांनी विकलांग आणि गतीमंद मुलींची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. या वेळी मुलींनी पारंपरिक वेशभूषेत नृत्य आणि गायनाचा कार्यक्रम सादर केला. मुलींनी रेखाटलेल्या चित्राचे प्रदर्शनही कार्यक्रमात भरवण्यात आले होते.

संबंधित विषय
ताज्या बातम्या