दानवेंची ईडी मार्फत चौकशी करा - सचिन सावंत

 Pali Hill
दानवेंची ईडी मार्फत चौकशी करा - सचिन सावंत
Pali Hill, Mumbai  -  

मुंबई - भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना तात्काळ अटक करून त्याची अंमलबजावणी संचालनालय (ईडी) मार्फत चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

"सरकारने चलनातून बाद केलेल्या जुन्या नोटा मला द्या. मी त्या बदलून नव्या नोटा देतो," असे वक्तव्य दानवे यांनी जाहिरपणे केले होते. दानवे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना सावंत म्हणाले की, "राज्यभरात नोटा बदलून देणाऱ्या टोळीचा सूत्रधार कोण आहे? हे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी बुलडाणा येथे जाहीर सभेत सांगितले आहे. दानवे हे भारतीय जनता पक्षाचे सदस्य आणि लोकसभेचे सदस्य असल्याने त्यांच्या वक्तव्याची गंभीर दखल घेऊन सरकारने त्यांना तात्काळ अटक करावी. तसेच दानवे आणि महाराष्ट्र प्रदेश भाजपाच्या गेल्या सहा महिन्यातील सर्व व्यवहारांची ईडी मार्फत चौकशी करावी," असी मागणी त्यांनी केली.

Loading Comments