रविंद्र वायकरांचा भाजपावर निशाणा

  Goregaon
  रविंद्र वायकरांचा भाजपावर निशाणा
  मुंबई  -  

  गोरेगाव - गोरेगाव पूर्व बिंबीसारनगरमध्ये शिवसेनेचे राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी रविवारी प्रचारसभा घेतली. प्रभाग क्रमांक 53 च्या उमेदवार रेखाताई रामवंशी यांच्या प्रचारासाठी ही सभा घेण्यात आली. रेखाताई गोरेगावात शिवसेनेच्या 10 वर्षापासून महिला उपशाखा संघटक म्हणून काम करत आहेत.

  मुख्यमंत्र्यांनी बोगस वचननामा जाहिर केला आहे. मुंबईत पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी राज्य शासनाकडून काहीच प्रयत्न केले जात नसल्याची टीका या वेळी रविंद्र वायकर यांनी भाजपावर केली.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.