Advertisement

सदा सरवणकरांनी दिला विभागप्रमुखपदाचा राजीनामा, उद्धव ठाकरेंच्या चिंतेत वाढ

एवढेत नव्हे तर त्यांच्यासोबतच्या नऊ पदाधिकाऱ्यांनीही पदांचे राजीनामे दिले आहेत.

सदा सरवणकरांनी दिला विभागप्रमुखपदाचा राजीनामा, उद्धव ठाकरेंच्या चिंतेत वाढ
SHARES

शिवसेनेचे बंडखोर आमदार सदा सरवणकर (sada sarvankar) यांनी त्यांच्यावर कारवाई होण्यापूर्वीच स्वत: हून शिवसेनेच्या विभागप्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे. एवढेत नव्हे तर त्यांच्यासोबतच्या नऊ पदाधिकाऱ्यांनीही पदांचे राजीनामे दिले आहेत.

सदा सरवणकर हे शिवसेनेचे आमदार आहेत. तसेच शिवसेनेचे विभागप्रमुख आहेत. दादर, प्रभादेवी, माटुंगा आणि माहीम परिसरात सरवणकर यांचं वर्चस्व आहे. हा भाग शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचं मानलं जात आहे. मात्र, सरवणकर यांनी बंड करून एकनाथ शिंदे गटात सामिल झाले. त्यानंतर शिंदे गटाचं राज्यात सरकार आलं. त्यामुळे शिवसेनेने पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी सुरू केली होती. शिवसेनेकडून हकालपट्टी सुरू असतानाच सदा सरवणकर यांनी विभागप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे.

सदा सरवणकर यांच्यासोबत तीन शाखाप्रमुख, शाखा समन्वयक, उफविभाग समन्वयक, दोन महिला शाखा संघटक आणि एका महिला उपविभाग समन्वयकाने पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे हे राजीनामे पाठवण्यात आले आहेत.

यांचे राजीनामे

सदा सरवणकर – विभागप्रमुख
मिलिंद तांडेल – शाखाप्रमुख
संदीप देवळेकर – शाखाप्रमुख
संतोष तेलवणे – शाखाप्रमुख
अजय कुसूम – शाखा समन्वयक
कुणाल वाडेकर – उपविभाग समन्वयक
अरुंधती चारी – महिला शाखासंघटक
मंदा भाटकर – शाखा संघटक
शर्मिला नाईक – महिला उपविभाग समन्वयक

दरम्यान, पालघर जिल्हा संपर्कप्रमुख रवींद्र फाटक आणि पालघर जिल्हाप्रमुख राजेश शहा यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांची समजूत काढण्यासाठी मिलिंद नार्वेकर सुरतला गेले होते. त्यांच्यासोबत रवींद्र फाटकही होते. आज फाटक यांचीच शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.



हेही वाचा

मनसेचा उद्याचा मेळावा पुढे ढकलला, राज ठाकरेंचा निर्णय

आदित्य ठाकरेंविरोधात FIR दाखल करा, राष्ट्रीय बाल आयोगाचे पोलिसांना निर्देश

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा