कांदिवलीतील वाहतूककोंडी सुटणार

Kandivali
कांदिवलीतील वाहतूककोंडी सुटणार
कांदिवलीतील वाहतूककोंडी सुटणार
See all
मुंबई  -  

कांदिवली - आकुर्ली रोड, ठाकूर कॉम्प्लेक्स आणि लोखंडवाला कॉम्प्लेक्स येथे दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाहतुककोंडीची समस्या भेडसावत आहे. ही समस्या सोडवण्यासाठी शनिवारी कांदिवली विधानसभा क्षेत्राचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुंबई वाहतूक विभागाचे सहआयुक्त मिलिंद भारांबे आणि उपायुक्त संजय जाधव यांच्यासोबत संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत भातखळकर यांनी दररोज भेडसावणारी वाहतूककोंडीची समस्या मांडली. यासह बिग बाजार येथून नवीन रस्ता तयार करणे, कांदिवलीतील सर्व्हिस रोडची दुरूस्ती करणे, कांदिवलीतील पार्किंग मैदान ताब्यात घेणे, महिंद्रा येथील प्रलंबित सर्व्हिस रोड सुरू करणे, आकुर्ली रोडवरील वाहतूककोंडी यासंदर्भात भातखळकर यांनी वाहतूक पोलीस विभागाचे सहआयुक्त भारांबे यांच्याकडे चर्चा केली. यावेळी सहआयुक्त भारांबे यांनी दहिसर वाहतूक पोलीस विभागाला वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्याचे आदेश दिले. भारांबे यांनी संपूर्ण परिसराला भेट देत या समस्यांचा आढावा घेतल्याची माहिती आमदार अतुल भातखळकर यांनी दिली.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.