चौकाला चंद्रकांत कांबळेंचं नाव

 Dadar
चौकाला चंद्रकांत कांबळेंचं नाव
चौकाला चंद्रकांत कांबळेंचं नाव
चौकाला चंद्रकांत कांबळेंचं नाव
See all

दादर - हिंदू कॉलनीतल्या डी. व्ही.प्रधान रोडवरील चौकाला बुधवारी डॉ. चंद्रकांत महादेव कांबळे यांचं नाव देण्यात आलंय. कामगार सेनेचे संस्थापक चंद्रकांत महादेव कांबळे यांच्या स्मृतीस अभिवादन म्हणून पालिकेनं चौकाला त्यांचं नाव दिलं. "माझ्या वडिलांनी केलेल्या आतापर्यंतच्या कामांची ओळख ही सर्वांना आहेच. या पुढेही ती लक्षात राहावी याच हेतूनं या चौकाचं नामकरण करण्यात आलंय, अशा भावना चंद्रकांत कांबळे यांचा मुलगा मयूर कांबळे यांनी व्यक्त केल्या.

चौक नामकरण कार्यक्रमात मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर, माजी महापौर श्रद्धा जाधव आणि महादेव देवळे तसंच खासदार राहुल शेवाळे सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव आदी उपस्थित होते.

Loading Comments