Advertisement

पाणी नाही तर मत नाही !


SHARES

बोरीवली - गेल्या पाच वर्षांपासून पाणीपुरवठा होत नसल्याने बोरीवली पूर्व इथल्या ऋषी वन कॉलनीतल्या रहिवाशांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. या कॉलनीत ला वेलेजा आणि ला विस्टा अशा दोन इमारती आहेत. ला वेलेजा इमारतीत एकूण 156 फ्लॅट आहेत. तर ला विस्टा या इमारतीत 128 फ्लॅट आहेत. या इमारतीतील रहिवासी पाच ते सात वर्षांपासून इथे वास्तव्याला आहेत. पण रोज पिण्याचं पाणीच मिळत नसल्याने रहिवाशांनी नाराजी व्यक्त करत मुंबई पालिका निवडणुकीत मतदान न देण्याचा निर्णय घेतलाय.

इथल्या रहिवाशांचं म्हणणं आहे की, बिल्डराने राहण्यासाठी जेव्हा ताबा दिला, तेव्हा लवकरच पाण्याची सोय करून दिली जाईल असं आश्वासन दिलं होतं. मात्र पाच वर्ष झाली तरी या इमारतीत पालिकेच्या वतीने पाण्याची सोय करण्यात आली नाही. त्यामुळे टँकरचं पाणी प्यावं लागत आहे. अनेकदा पालिकेच्या कार्यालयात खेटे मारूनही पाणी मिळत नाही. टँकरच्या पाण्यामुळे मुलांचं आरोग्य धोक्यात आल्याचा आरोपही रहिवाशांनी केला आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा