मतदार याद्यांच्या घोळाचा फटका मतदारांना

  मुंबई  -  

  वांद्रे -  सरकार, पालिका प्रशासन, निवडणूक आयोग अशा सर्वांनीच मुंबईकरांना मतदान करण्याचं आवाहन केलं. त्यानुसार मुंबईकर मतदानासाठी बाहेरही पडले. पण मतदान केंद्रावर गेल्यानंतर आपली नावंच यादीत नसल्याचं त्यांना समजलं. हा प्रकार घडलाय वांद्रेतल्या एमआयजी फाईव्ह कॉलनीतल्या रहिवाशांबाबत. पुनर्विकास सुरू असलेल्या या कॉलनीतल्या 3 ते 4 बिल्डींगमधल्या रहिवाशांची नावंच मतदार यादीतून गायब झाली आहेत.

  दिवसभर वणवण केल्यानंतरही नावं न सापडल्यानं हे रहिवाशी मत न देताच माघारी फिरले. फक्त जीवन विद्या मंदिर येथेच नाही तर महात्मा गांधी विद्यामंदिर आणि इतर केंद्रांवरही हाच गोंधळ पाहायला मिळाला. त्यामुळे मतदान करा म्हणताय पण नावंच नाहीत तर मतदान कसं करणार असाच प्रश्न एमआयजी कॉलनीच्या रहिवाशांना पडला असावा. 

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.