Advertisement

मंत्रालयात 'बाटली बंद', सुरक्षा रक्षकांना कशाची चिंता? वाचा...


मंत्रालयात 'बाटली बंद', सुरक्षा रक्षकांना कशाची चिंता? वाचा...
SHARES

मल्टिप्लेक्स, थिएटर किंवा स्टेडियममध्ये सध्या बाटलीतून बाहेरचं पाणी आत नेण्यास मज्जाव केला जातो. तसाच काहीचा प्रकार सध्या मंत्रालयात सुरू आहे. त्यामुळं तुम्ही जर मंत्रालयात जाणार असाल आणि तुमच्या हातात किंवा बॅगेत पाण्याची बाटली असेल, तर या बाटलीतील पाणी तुम्हाला सुरक्षा रक्षकांना पिऊन दाखवावं लागणार आहे. अन्यथा तुम्हाला बाटली आत नेताच येणार नाही.


का होतेय पाण्याची तपासणी?

नुकतीच एक व्यक्ती मंत्रालायात एका मंत्री महोदयांकडे कामानिमित्त आली होती. या व्यक्तीचं काम समाधानकारक न झाल्यानं या व्यक्तीनं मंत्रालयाच्या आवारात विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं पुन्हा असा अनुचित प्रकार मंत्रालय परिसरात घडू नये म्हणून ही खबरदारी घेण्यात येत असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर बॅगेतील बाटलीची तपासणी होत असल्याची माहिती 'मुंबई लाइव्ह'च्या प्रतिनिधींना मिळाल्यावर आम्ही 'रिअॅलिटी चेक' केल्यावर आम्हालाही तोच अनुभव आला. अर्थात ही गोष्ट आतील विक्रेत्यांना फायदा होण्यासाठी नव्हे, तर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून होत असल्याचं स्पष्ट आहे.

याबाबत सुरक्षा रक्षकांना विचारले असता त्यांनी खबरदारी म्हणून ही कारवाई करत असल्याचं सांगितलं. पुन्हा अशी घटना घडली, तर पोलीस यंत्रणेला जबाबदार धरलं, जाईल यासाठी अशा पद्धतीची कारवाई होत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.



हे देखील वाचा -

मंत्रालयाच्या दारातच गुटखाबंदीचा पर्दाफाश



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा