Advertisement

मंत्रालयाच्या दारातच गुटखाबंदीचा पर्दाफाश


मंत्रालयाच्या दारातच गुटखाबंदीचा पर्दाफाश
SHARES

राज्य सरकारने गुटखा बंदीचा निर्णय घेतला खरा, पण या निर्णयाची परिणामकारक अंमलबजावणी करणे सरकारला अजूनही जमलेले नाही. त्यामुळे सद्यस्थितीतही राज्यभर गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची सर्रासपणे विक्री सुरू आहे. एवढेच नव्हे, तर जेथून हे गुटखाबंदीचे आदेश निघाले त्या मंत्रालयात देखील हे नियम धाब्याबर बसवले जात अाहेत.

मंत्रालयात विविध कामांसाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची गेटवर कसून तपासणी केली जाते. या तपासणीत दररोज मोठ्या प्रमाणात गुटख्याची पाकिटे आणि तंबाखूच्या पुड्याही संबंधित व्यक्तींकडे सापडतात. मात्र या व्यक्तींवर कुठलीही कारवाई न करता केवळ या पुड्या बाजूला काढून त्यांना आत पाठवले जाते.


सुरक्षा रक्षकांचे काम पुड्या जमा करणे?

या पुड्यांची संख्या पाहता, मंत्रालयाची सुरक्षा राहिली दूर, पण सुरक्षा रक्षकांचा ड्युटीवरील बहुतांश वेळ पुड्या जमा करण्यातच जात असावा, असे दिसते. मंत्रालयात भेटायला येणाऱ्या माणसाला कायद्याची भीती वाटत नसेल, तर राज्यात काय चित्र सुरू असेल, याचा विचार न केलेलाच बरा.

आधीही मंत्रालय परिसराबाहेर सर्रास गुटखा विक्री होत असल्याचे स्टिंग ऑपरेशन 'मुंबई लाइव्ह'ने केले होते.

मंत्रालयात येणाऱ्या अनेक जणांच्या खिशात रोज गुटखा, तंबाखू हमखास सापडते. या पुड्या जप्त करून आम्ही कचऱ्यात टाकून देतो अशी प्रतिक्रिया गेटवर असणाऱ्या सुरक्षा रक्षकांनी दिली. यावरून सरकारची ही गुटखा बंदी केवळ कागदावरच आहे का? हा प्रश्न निर्माण झाला आहे.हे देखील वाचा -

पानमसाला-गुटखा बंदीची ऐशी-तैशी करणाऱ्यांचीच होणार ऐशी तैशी डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा