कोळीवाड्यातील जागा होणार रहिवाशांच्या नावावर!

कोळीवाड्यांचं सीमांकन करण्यास महसूल विभागाने सुरूवात केली आहे. शुक्रवारी महसूल मंत्र्यांनी राहत्या घराची जागा रहिवाशांच्या नावावर करण्याचा निर्णय जाहीर केला अाहे. यामुळे मुंबईतील कोळीवाड्यांमधील अडीच ते ३ लाख रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

SHARE

मुंबईसह ठाणे, पालघर परिसरातील कोळीवाड्यातील राहत्या घरांच्या जागा रहिवाशांच्या नावावर करण्यात येतील, अशी घोषणा विधानसभेत शुक्रवारी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. याशिवाय मासे सुकवण्यासाठी व जाळी विणण्यासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या जागा अन्य कोणत्याही कामासाठी वापरण्यात येऊ नये, अशा सूचना सर्व जिल्हाधिकाऱ्यांना येतील असंही त्यांनी जाहीर केलं.


आशिष शेलार यांची लक्षवेधी

कोळीवाड्यातील घरांच्या जागा व इतर प्रश्नांबाबत मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अॅ‍ड. आशिष शेलार यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर बोलताना महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोळीवाड्यातील घरांचा सातबारा रहिवाशांच्या नावे करण्यात येईल अशी घोषणा केली.


३ लाख रहिवाशांना दिलासा

मुंबईत सुमारे ४० कोळीवाडे असून त्यातील ३६ कोळीवाडे हे सरकारी जमिनीवर आहेत. या कोळीवाड्यांचं आजपर्यंत सीमांकन झालेलं नाही. मुंबईचा नवा विकास आराखडा तयार होण्यापूर्वीच हे सीमांकन करा अशी मागणी सातत्याने होत आहे. त्यानुसार आता कोळीवाड्यांचं सीमांकन करण्यास महसूल विभागाने सुरूवात केली आहे. शुक्रवारी महसूल मंत्र्यांनी राहत्या घराची जागा रहिवाशांच्या नावावर करण्याचा निर्णय जाहीर केला अाहे. यामुळे मुंबईतील कोळीवाड्यांमधील अडीच ते ३ लाख रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.हेही वाचा -

शिवरायांच्या पुतळ्याची उंची कमी करून महाराष्ट्राची मान झुकवली - विखे पाटील

आमदारांच्या प्रवास भत्त्यात तिप्पट वाढ 

संबंधित विषय
ताज्या बातम्या