Advertisement

आमदारांच्या प्रवास भत्त्यात तिप्पट वाढ

पेट्रोल-डिझेलच्या दरातील वाढ , जनतेच्या कामासाठी, अधिवेशन, बैठकांसाठी फिरण्याच्या खर्चाचा विचार आमदारांच्या भत्त्यात वाढ करण्यासाठी करण्यात आल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री गिरीष बापट यांनी दिली. या वाढीनुसार आमदारांचा मासिक पगार २,५७,१२० रुपये इतका झाला आहे.

आमदारांच्या प्रवास भत्त्यात तिप्पट वाढ
SHARES

इंधनदरवाढीने पिचलेली देशभरातील जनता 'अच्छे दिन' येतील या आशेवर जगत असताना राज्य सरकारने सर्वसामान्यांकडे कानाडोळा करत आमदारांच्या प्रवास भत्त्यात तिप्पट वाढ केली आहे. विधानसभेच्या नागपूर पावसाळी अधिवेशात वेतन भत्त्यांसदर्भातील सुधारणा विधेयक एकमताने मंजूर करण्यात आलं. यानुसार आमदारांना प्रति किलोमीटर ६ रुपयांऐवजी आता २० रुपये प्रवास भत्ता मिळणार आहे.


आधीची वाढ

यापूर्वी २०१६ मधील पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधिमंडळात एका विधेयकाद्वारे विद्यमान आमदार आणि माजी आमदारांचं वेतन, भत्ते तसंच निवृत्तिवेतन वाढविण्यात आलं होतं.



कारण काय?

पेट्रोल-डिझेलच्या दरातील वाढ , जनतेच्या कामासाठी, अधिवेशन, बैठकांसाठी फिरण्याच्या खर्चाचा विचार आमदारांच्या भत्त्यात वाढ करण्यासाठी करण्यात आल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री गिरीष बापट यांनी दिली. या वाढीनुसार आमदारांचा मासिक पगार २,५७,१२० रुपये इतका झाला आहे.


लोकप्रतिनिधींची सुटका

सर्वसामान्य जनता इंधन दरवाढीमुळे त्रस्त असताना लोकप्रतिनिधींनी मात्र या महागाईतून आपली सुटका करून घेतल्याचं यानिमित्ताने दिसून आलं. यामुळे राज्याच्या तिजोरीवर आणखीन भार पडणार आहे.


आमदारांना मिळणारा भत्ता 'असा'

  • महागाई भत्ता ९१,१२० रुपये
  • दूरध्वनी खर्च ८०,००० रुपये
  • संगणक चालकाचा पगार १०,००० रुपये
  • टपालासाठी १०,००० रुपये
  • मूळ पगार ६७,००० रुपये



हेही वाचा-

मुंबई-गोवा महामार्ग १५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा - चंद्रकांत पाटील

दूधकोंडी आंदोलन मागे - राजू शेट्टींची घोषणा



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा