बॉलिवूड अभिनेत्री रिमी सेनचा भाजपात प्रवेश

 Pali Hill
बॉलिवूड अभिनेत्री रिमी सेनचा भाजपात प्रवेश
Pali Hill, Mumbai  -  

मुंबई - बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रिमी सेन हिने मंगळवारी भाजपात प्रवेश केला. 2003 साली दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्या कॉमेडी चित्रपट हंगामामधून तिने आपल्या करियरची सुरुवात केली होती. तसंच रिमीने 2015ला रिअॅलिटी शो बिग बॉसमध्ये ही सहभाग घेतला होता. रिमी सेनने अजय देवगण, सलमान खान आणि अक्षय कुमार यांच्याबरोबरही काम केलं आहे. चित्रपट बागबानमध्येही तिने छोटी भूमिका साकारली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आपल्यावर चांगला प्रभाव असल्याचं रिमी ने भाजपात प्रवेश केल्यानंतर म्हटलंय. तसंच आपल्यावर देण्यात येणाऱ्या जबाबदारी पूर्णपणे पार पाडणार असल्याचंही रिमी ने या वेळी म्हटलंय.

Loading Comments