महिलांची रेशन कार्यालयावर धडक


SHARE

चेंबूूर - एेन दिवाळीच्या तोंडावर पुन्हा डाळींचे भाव कडाडल्यानं दिवाळी कशी साजरी करायची, असा प्रश्न महिलांना पडलाय. त्यामुळं रेशनकार्ड धारकांना सर्व डाळी आणि रॉकेल या सणासुदीच्या काळात माफक दरात मिळावं, अशी मागणी करत शनिवारी मुंबई महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकत्यांनी चेंबूूर रेशन कार्यालयावर धडक दिली. या वेळी महिला तालुका अध्यक्षा आशाताई मराठे यांनी शिधावाटप अधिकाऱ्यांना निवेदन देत सर्व कार्डधारकांना माफक दरात डाळी देण्याचं निवेदन दिलं. तसं न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही या वेळी अधिकाऱ्यांना देण्यात आला.

संबंधित विषय
ताज्या बातम्या