Advertisement

पियुष गोयल यांच्या आरोपांना रितेश देशमुखचं प्रत्युत्तर

गोयल यांच्या २६/११ वरून केलेल्या टीकेला विलासराव यांचा मुलगा रितेश देशमुखनं सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं आहे.

पियुष गोयल यांच्या आरोपांना रितेश देशमुखचं प्रत्युत्तर
SHARES

केंद्रीय रेल्वेमंत्री आणि भाजपा नेते पियुष गोयल यांनी सोमवारी २६/११च्या मुंबई हल्ल्याचा संदर्भ देताना माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्यावर टीका केली होती. गोयल यांच्या टीकेला विलासराव यांचा मुलगा रितेश देशमुख यानं सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं आहे.

२६/११च्या मुंबई हल्ल्यादरम्यान दिवंगत विलासराव देशमुख एका चित्रपटाच्या दिग्दर्शकाला घेऊन ताज हॉटेलमध्ये गेले होते. त्याच्या चित्रपटात मुलाला काम मिळावं म्हणून ते धडपडत होते, अशी टीका गोयल यांनी सोमवारी एका कार्यक्रमात केली होती.


तुम्ही उशीर केलात

पियुष गोयल यांना रितेश देशमुखनं ट्विटरवर एक पत्र पोस्ट करत उत्तर दिलं आहे. "माझ्या वडिलांनी मला चित्रपटात काम मिळावं म्हणून ते कधीच कुठल्या दिग्दर्शक किंवा निर्मात्याशी बोलले नाहीत आणि त्याचा मला अभिमान आहे. मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारण्याचा तुम्हाला अधिकार आहे. मात्र, जी व्यक्ती तुमच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी जिवंत नाही, तिच्यावर आरोप करणे चुकीचं आहे. तुम्ही थोडा उशीर केलात. सात वर्षांपूर्वी त्यांनी तुम्हाला उत्तर दिलं असतं." 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा