Advertisement

आठवलेंची लोकसभेतून माघार, मुख्यमंत्र्यांनी दिलं राज्यसभेचं आश्वासन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना राज्यसभेचं आश्वासन दिल्याने आपण लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्याचं रामदास आठवले यांनी सांगितलं.

आठवलेंची लोकसभेतून माघार, मुख्यमंत्र्यांनी दिलं राज्यसभेचं आश्वासन
SHARES

लोकसभा निवडणुकीसाठी दक्षिण मध्य मुंबईतून उमेदवारी मिळावी अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली होती. मात्र, या मतदारसंघाची उमेदवारी विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांना देण्यात आल्याने आठवले नाराज होते. या पार्श्वभूमीवर रविवारी शिवसेना उमेदवार राहुल शेवाळे यांनी आठवलेंची निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना राज्यसभेचं आश्वासन दिल्याने आपण लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्याचं सांगितलं.

राज्यसभेचं आश्वासन 

दक्षिण मध्य मुंबईतून मी याआधी निवडून आलो होतो. त्यामुळे इथं मला पुन्हा संधी मिळावी अशी  इच्छा होती. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर मित्रपक्षांशी याबाबत बोलणंदेखील झालं होतं. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी शनिवारी झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी मला राज्यसभेचं आश्वासन दिलं आहे. त्यामुळे माघार घेत असल्याचं आठवले यांनी सांगितलं. 


प्रचारात सहभागी होणार

राहुल शेवाळे माझे चांगले मित्र आहेत. युतीचा धर्म पाळत मी आणि माझे कार्यकर्ते शेवाळेंच्या प्रचारात सहभागी होणार असल्याचंही आठवले यांनी स्पष्ट केलं.



हेही वाचा -

मुंबई इंडियन्सची ओपनिंग पराभवाने, दिल्ली ३७ धावांनी विजयी



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा