• रिपाइं पक्षाचा मेळावा
  • रिपाइं पक्षाचा मेळावा
  • रिपाइं पक्षाचा मेळावा
  • रिपाइं पक्षाचा मेळावा
SHARE

अंधेरी पूर्व - मरोळ येथे पालिका निवडणूक रणनीती ठरवण्यासाठी रिपाइं पक्षाचा मेळावा शनिवारी पार पडला. लॉरेंन्स हायस्कुलजवळील शांती सदन फाउंडेशन हॉलमध्ये हा मेळावा पार पडला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार आणि पश्चिम मुंबई जिल्ह्याच्या सहयोगाने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात मुंबई जिल्ह्याचे अध्यक्ष प्रकाश जाधव, पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर तसंच पक्षाचे विविध आघाड्यांचे पदाधिकारी आणि इच्छुक उमेद्वार उपस्थित होते.

संबंधित विषय
ताज्या बातम्या