भाजपा उमेदवारांना रिपाइंचा पाठिंबा

 Mumbai
भाजपा उमेदवारांना रिपाइंचा पाठिंबा
Mumbai  -  

मुंबई - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानं (आठवले गट) विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपा उमेदवारांना पाठिंबा घोषित केला आहे. पक्षाचे नेते सुरेश बारसिंग आणि घनश्याम चिरणकर यांनी भाजपा प्रवक्ते माधव भंडारी यांच्यासोबत भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. या वेळी भाजपाच्या विधान परिषद, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातल्या उमेदवारांना पाठिंब्याची घोषणा करण्यात आली. त्यानुसार कोकण, औरंगाबाद आणि नागपूर शिक्षक संघातून वेणूनाथ कडू, सतीश पत्की आणि नागो गाणार यांची तर पदवीधर मतदारसंघासाठी नाशिक आणि अमरावतीतून प्रशांत पाटील तसंच रणजित पाटील या उमेदवारांना आता रिपाइंचीही ताकद मिळेल. भाजपानं या चारही जागा निवडून आणण्यासाठी कंबर कसली आहे.

Loading Comments