Advertisement

किरवले यांच्या हत्येच्या निषेधार्थ आरपीआयचे आंदोलन


किरवले यांच्या हत्येच्या निषेधार्थ आरपीआयचे आंदोलन
SHARES

सीएसटी - ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत साहित्यिक डॉ. कृष्णा किरवले यांच्या कोल्हापुरात झालेल्या हत्येच्या निषेधार्थ रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आझाद मैदानात सोमवारी तीव्र आंदोलन करण्यात आले.

डॉ. कृष्णा किरवले यांच्यावरील हल्ला हा पुरोगामी परिवर्तनवादी चळवळीवरील हल्ला आहे. आंबेडकरी विचारवंतांच्या हत्येने आंबेडकरी विचार संपू शकत नाही. विचारवंतांची हत्या होणे ही महाराष्ट्राच्या सामाजिक लौकिकाला काळिमा फासणारी घटना आहे अशी भावना यावेळी आंदोलकांनी व्यक्त केली. याचा रिपाइंतर्फे तीव्र निषेध करण्यासाठी तसेच डॉ. कृष्णा किरवले यांच्या हत्येची सीबीआय तर्फे चौकशी व्हावी आणि मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा करावी या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षातर्फे मुंबईत आझाद मैदानात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मुंबईतल्या सर्व रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. दक्षिण मुंबईच्या आठवले गट अध्यक्ष सोना कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा