Advertisement

सानुग्रह अनुदानाबाबत सोमवारी निर्णय ?


सानुग्रह अनुदानाबाबत सोमवारी निर्णय ?
SHARES

मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना 14 हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळण्याची शक्यता आहे. सोमवारी गटनेत्यांच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होईल.

गेल्या वर्षी कर्मचाऱ्यांना 13 हजार 500 रुपये सानुग्रह अनुदान मिळालं होतं. महापालिका कर्मचारी संघटनेनं यंदा 20 हजार रुपये तर म्युनिसिपल मजदूर संघानं 30 हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळावं, अशी मागणी केलीये. गेल्या आठवडयात अनुदानाबाबत निर्णय घेण्यासाठी सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक बोलवण्यात आली होती. परंतु, विरोधी पक्षांचे गटनेते उपस्थित नसल्यामुळे अनुदानाबाबत निर्णय झाला नव्हता. त्यात महापालिका निवडणूक तोंडावर असल्यानं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीपेक्षा अधिक सानुग्रह अनुदान मिळेल, अशी कर्मचाऱ्यांची अपेक्षा आहे. त्यामुळे सोमवारी होणाऱ्या गटनेत्यांच्या बैठकीकडे महापालिका कर्मचाऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

संबंधित विषय
Advertisement