भारताला मोठे करायचे आहे तर भारताला ओळखा - मोहन भागवत

Dadar

See all
मुंबई  -  

संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत (यूएनएससी) भारताला कायमस्वरूपी स्थान मिळालेच पाहिजे. जगामध्ये ताकदवान असलेल्या देशांना मानतात. भारताला ताकदवान देश बनविणे गरजेचे आहे. भारताला मोठे करायचे आहे यासाठी भारताला ओळखा. मेक इन इंडिया करत करत मेड इन इंडिया करायचे आहे, असे वक्तव्य आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत यांनी केले.

इंडियन इंटरनॅशनल मॉडेल युनायटेड नेशन्स नावाच्या संस्थेने मुंबईतील दादरमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये मोहन भागवत बोलत होते. या कार्यक्रमासाठी मुंबईतील विविध शाळेतील मुले हजर होती.

भारत एक जमिनीचा तुकडा नाही. भारत आमचा स्वभाव आहे. भारताचा अर्थच आहे आंतरराष्ट्रीय असणे. भारताने सर्व जगाला एक कुटुंब मानले आहे. वेगवेगळे शरीर असले तरी सर्वांची मने आणि प्राण एकच पाहिजे. दहशतवाद कोण आणि का वाढवत आहे हे जाणून घ्या. विश्वामध्ये शांती आणण्यासाठी एकमात्र देश भारत आहे जो पूर्णपणे निष्पक्ष आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेतील जागेसाठी कोणालाही भारताला प्रश्न विचारण्याचा हक्क नाही

- मोहन भागवत, सरसंघचालक

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.