रुक्साना सईद यांचा उमेदवारी अर्ज दाखल

 Mumbai
रुक्साना सईद यांचा उमेदवारी अर्ज दाखल
रुक्साना सईद यांचा उमेदवारी अर्ज दाखल
रुक्साना सईद यांचा उमेदवारी अर्ज दाखल
See all
Mumbai  -  

भायखळा - प्रभाग क्रमांक 212 इथल्या समाजवादी पक्षाच्या उमेदवार रुक्साना सईद यांनी बुधवारी दुपारी एल्फिन्स्टन महाविद्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी समाजावादी पक्षाचे मायनॉरिटी प्रेसिडेंट सईद मुस्सा आणि समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. यानंतर आता रुक्साना सईद यांनी महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. सध्या प्रभाग क्रमांक 212 मध्ये रुक्साना या प्रत्येक इमारती आणि चाळीत जाऊन तिथल्या रहिवाशांच्या समस्या जाणून घेत आहेत. सध्या 212 मधून अखिल भारतीय सेनेच्या गीता गवळी या नगरसेविका आहेत. या वेळीही गिता या 212 मधून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांना टक्कर देण्यासाठी रुक्साना या जोरात कामाला लागलेल्या दिसत आहेत.

Loading Comments