खड्डे प्रश्नी राष्ट्रवादीही आक्रमक


SHARE

मुंबई – दिवसेंदिवस गंभीर होत असलेल्या मुंबईतील खड्ड्यांच्या प्रश्नी आता राष्ट्रवादी काँग्रेसही आक्रमक झाली आहे. "पालिका प्रशासनाला मुंबईत नेमके किती खड्डे आहेत हे माहिती नाही. त्यामुळे खड्ड्यांच्या मोजणीच्या मोहिमेतून मुंबईत किती खड्डे आहेत हे आम्ही दसऱ्या दिवशी पालिका प्रशासनाला दाखवून देऊ", असा इशारा राष्ट्रवादी कांग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी गुरुवारी प्रशासनाला दिला.

खड्डे बुजवण्याच्या मागणीसह मुंबईतील 14 फुटांहून अधिक उंचीच्या झोपड्यांविरोधातील कारवाईला स्थगिती दयावी, या मागणीसाठी अहिर यांनी पालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेतली. दरम्यान, "पालिका आयुक्तांनी खड्डे बुजवण्याचे काम सुरू असून, 10 आॅक्टोबरपर्यंत खड्डे बुजवले जातील, असे आश्वासन आयुक्तांनी दिले आहे. त्यामुळे 10 आॅक्टोबरपर्यंत खड्डे बुजले नाही तर आम्ही 10 तारखेलाच खड्डयांची मोजणी करून दसऱ्याच्या दिवशी पालिका आयुक्तांना खड्ड्यांच्या नेमक्या आकडेवारीची भेट देऊ, असेही अहिर यांनी सांगितले आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या