Advertisement

महिलांना ‘सखी’चं आकर्षण

राज्यातील चौथ्या आणि अखेरच्या टप्प्याच्या मतदानाला सोमवारी सकाळपासून सुरूवात झाली. यावेळी मतदानाची खासियत म्हणजे निवडणूक आयोगानं मतदारांच्या सोयीसाठी अनेक नवनव्या योजना आखल्या आहेत.

महिलांना ‘सखी’चं आकर्षण
SHARES

राज्यातील चौथ्या आणि अखेरच्या टप्प्याच्या मतदानाला सोमवारी सकाळपासून सुरूवात झाली. यावेळी मतदानाची खासियत म्हणजे निवडणूक आयोगानं मतदारांच्या सोयीसाठी अनेक नवनव्या योजना आखल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार अनेक मतदान केंद्रांवर सखी बुथ उभारण्यात आले आहेत. याच सखी बुथचं महिला, माता मतदारांना आकर्षण वाटत आहे. या बुथमध्ये येणाऱ्या प्रत्येक महिला मतदाराचं फुल देऊन स्वागत करण्यात येत असून गुलाबी रंगाच्या पोषाखात या ठिकाणी महिला कर्मचाऱ्यांनाही तैनात करण्यात आलं आहे.


अनेक मतदान केंद्रांवर असलेले सखी बुथ सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहेत. या सखी बुथच्या बाहे रांगोळी काढण्यात आली असून त्याठिकाणी फुग्यांची सजावटही करण्यात आली आहे. तसंच या ठिकाणी सेल्फी पॉईंटही उभारण्यात आला आहे. माता मतदारांसाठी या ठिकाणी खास सोय करण्यात आली असून बालकांना सांभाळण्यासाठी या ठिकाणी पाळणेही ठेवण्यात आले आहेत. तसंच मतदानासाठी या ठिकाणी निरनिराळे संदेशही लावण्यात आले आहेत. महिलांसाठी राबवण्यात येत असलेल्या या उपक्रमाचं महिला मतदारांकडून स्वागत करण्यात येत आहे. दरम्यान, अनेक महिलांनी या उपक्रमाचं कौतुक करत निवडणूक आयोगाचेही आभार मानले आहेत.हेही वाचा -

डोंबिवली, बोरीवलीत मतदारांचा खोळंबा

यंदा देशात मोदी त्सुनामी – पूनम महाजनसंबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा