Advertisement

यंदा देशात मोदी त्सुनामी – पूनम महाजन

देशात यावेळी मोदी लाट नसून मोदी त्सुनामी असल्याची प्रतिक्रिया भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजन यांनी दिली. सोमवारी सकाळी लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदानाला सुरूवात झाली. त्यानंतर माध्यमांना त्यांनी प्रतिक्रिया दिली.

यंदा देशात मोदी त्सुनामी – पूनम महाजन
SHARES

देशात यावेळी मोदी लाट नसून मोदी त्सुनामी असल्याची प्रतिक्रिया भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजन यांनी दिली. सोमवारी सकाळी लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदानाला सुरूवात झाली. त्यानंतर माध्यमांना त्यांनी प्रतिक्रिया दिली.


षटकार ठोकणारच

यावेळी देशात मोदी लाट नाही तर मोदी त्सुनामी असल्याची प्रतिक्रिया पूनम महाजन यांनी दिली. मुंबईतील सहाही मतदारसंघांमध्ये शिवसेना-भाजप युतीचे उमेदवारच विजयी होणार असल्याचं सांगत यावेळीही आपण षटकार ठोकणारच असा दावा त्यांनी केला.

उत्तर मध्य मुंबईत भाजपच्या पूनम महाजन यांची थेट लढत काँग्रेसच्या प्रिया दत्त यांच्याशी होणार आहे. दरम्यान यावर्षी त्यांच्या मतदारसंघातील मतदारांची संख्या १८ लाखांवरून साडेसोळा लाखांच्या जवळ आली आहे. त्यामुळं यावेळी मतदार कोणाला कौल देतात हे पहावं लागणार आहे. पूनम महाजन यांच्यासोबत त्यांचे बंधू राहुल महाजन यांनीही त्यांचा मतदानाचा हक्क बजावला. सकाळी धावणं चालणं आरोग्यासाठी उत्तम असतं तसं सकाळी मतदान करणं लोकशाहीसाठी उत्तम असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.




हेही वाचा - 

मतदार यादीत हजारो बोगस नावं; शिवसेना, बविआचा आरोप



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा