Advertisement

डोंबिवली, बोरीवलीत मतदारांचा खोळंबा

उत्तर मुंबई मतदारसंघातील बोरीवली पश्चिमेतील दोन ठिकाणी मतदान प्रक्रिया उशीरा सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. मतदानाला उशीरा सुरूवात झाल्यामुळं मतदारांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं.

डोंबिवली, बोरीवलीत मतदारांचा खोळंबा
SHARES

उत्तर मुंबई मतदारसंघातील बोरीवली पश्चिमेतील दोन ठिकाणी मतदान प्रक्रिया उशीरा सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. मतदानाला उशीरा सुरूवात झाल्यामुळं मतदारांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. तर दुसरीकजे डोंबिवलीतही अनेक मतदान केंद्रांवर इव्हीएम मशीन बंद पडल्यानं मतदारांना समस्यांचा सामना करावा लागला.


अनेकजण माघारी

बोरीवली पश्चिमेतील गोराई वन या ठिकाणी असलेल्या स्वामी विवेकानंद शाळेतील बुथ क्रमांक ५० वर अनेक मतदारांनी सकाळी साडेसहा वाजल्यापासून रांग लावली होती. मात्र, सात वाजल्यानंतरही मतदान न सुरू झाल्यानं मतदारांमध्ये गोंधळाचं वातावरण पसरलं होतं. तसंच मतदान उशीरा सुरू होण्याचं कारणंही सांगण्यात न आल्यानं अनेकांना मतदान न करताच माघारी परतावं लागलं. अशाच परिस्थितीचा सामना मतदारांना सुविद्यालय शाळेतही करावा लागला.


डोंबिवलीतही ईव्हीएम बंद

डोंबिवलीतही अनेक मतदान केंद्रांमध्ये ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्यामुळं मतदान प्रक्रिया काही काळासाठी रखडली होती. मतदारांना बराच काळ उभं राहावं लागल्यानं मतदारांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं.



हेही वाचा -

यंदा देशात मोदी त्सुनामी – पूनम महाजन



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा