Advertisement

अबू आझमींनी मंत्रालयात दिल्या आदित्य ठाकरेंविरोधात घोषणा

सत्तेतील महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा देणारे समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आझमी यांनी मानखुर्दमधील प्रदूषणाच्या मुद्द्यावरून चक्क पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या विरोधात घोषणा दिल्या.

अबू आझमींनी मंत्रालयात दिल्या आदित्य ठाकरेंविरोधात घोषणा
SHARES

महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा देणारे समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आझमी यांनी मानखुर्दमधील प्रदूषणाच्या मुद्द्यावरून चक्क पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या विरोधात घोषणा दिल्या. मंत्रालयात विरोधाचे फलक देखील आझमी यांनी झळकावले. (samajwadi party mla abu azmi protest against environment minister aaditya thackeray and demands to shut sms envoclean company)

मानखुर्द, शिवाजीनगर भागात एसएमएस कंपनीमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. एसएमएस कंपनीमुळे या परिसरात राहणाऱ्या सुमारे १२ लाख रहिवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचा अबू आझमी यांचा दावा आहे. परंतु ही कंपनी बंद करण्याची मागणी करत असून देखील पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आमच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप अबू आझमी यांनी केला. त्यामुळे आझमी यांनी बुधवारी मंत्रालयात आदित्य ठाकरे यांच्याविरोधात घोषणा दिल्या तसंच मागणीचे फलकही त्यांनी झळकावले. 

हेही वाचा - ही तर अॅक्शनवर, रिअॅक्शन- अबू आझमी

समाजवादी पक्षाने सत्ताधारी ठाकरे सरकारला पाठिंबा दिलेला आहे. तरीही हे सरकार आमचं ऐकत नाही. एवढंच नाही, तर आदित्य ठाकरे लोकप्रतिनिधींचा साधा फोनही उचलत नाहीत, असा आरोप अबू आझमी यांनी यावेळी केला. आझमी यांच्यासोबत नगरसेवक अख्तर कुरेशी, नगरसेविका रुकसाना सिद्धिकी, आयशा रफिक शेख, सायरा फहाद आझमी, इरफान खान देखील या घोषणाबाजीत सामील होते. 

एसएमएस एक्व्हाक्लीन कंपनीमुळे एम ईस्ट वाॅर्डातील गोवंडी, शिवाजी नगरमध्ये मोठ्या प्रमाणात टीबीचे पेशंट आढळून येत आहेत. या कंपनीतून निघणाऱ्या प्रदूषणामुळे स्थानिक रहिवाशांचं सरासरी आयुर्मान ३९ वर्षांपर्यंत खाली आलं आहे. तरीही या कंपनीच्या विस्तारासाठी मुंबई महापालिकेकडून ३ एकर जागा देण्यात येत आहे. प्रकार तातडीने थांबवून कंपनी बंद करावी, अशी मागणी अबू आझमी यांच्याकडून सातत्याने करण्यात येत आहे.  


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा