Advertisement

कमला मिल कंपाऊंड आगीची न्यायालयीन चौकशी व्हावी' - संदीप देशपांडे


कमला मिल कंपाऊंड आगीची न्यायालयीन चौकशी व्हावी' - संदीप देशपांडे
SHARES

कमला मिल्स कंपाऊंडमध्ये 'वन अबोव्ह' आणि 'मोजोस बिस्ट्रो' या पबला लागलेल्या आगीप्रकरणी रोज नवनवीन धक्कादायक माहिती उघडकीस येत आहे. या मिलच्या जागेवर करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामाबाबत आता मुंबई महापालिकेने भन्नाट जावईशोध लावला आहे. माहितीच्या अधिकारांतर्गत दिलेल्या उत्तरात महापालिकेनं या जागेवर कुठलंही अनधिकृत बांधकाम झालेलं नाही तसेच बांधकाम झालेलं आहे अशी उत्तरं दिली आहेत. या सगळ्या प्रकाराबाबत आता मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे.


चौकशी निवृत्त न्यायाधीशांमार्फत

या पब्सना महापालिका आयुक्तांनी वापरात बदल करण्यासह अन्य प्रकारच्या परवानग्या आयुक्तांच्या आदेशानुसारच दिल्या आहेत. त्यामुळे आयुक्तांमार्फत होणाऱ्या चौकशीवर आम्हाला विश्वास नसून ही चौकशी न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत केली जावी, अशी मागणी संदीप देशपांडे आणि विभाग अध्यक्ष संतोष धुरी यांनी केली आहे.


'यांचं निलंबन करा'

मनसेचे शाखाध्यक्ष उत्तम सांडव आणि मंगेश कशाळकर यांनी माहितीच्या अधिकारात यासंदर्भात जी माहिती मागवली होती, त्याबाबत एकाच अधिकाऱ्याने वेगवेगळी उत्तरं दिली आहेत. त्यामुळे मिलिंद व्हटकर यांना निलंबित करण्याची मागणी करताना आयुक्तांमार्फत होणाऱ्या चौकशीवर संशय व्यक्त केला आहे..

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा