‘घडाळ्याचा काटा अडकला, भगवा फडकला’

 Mumbai
‘घडाळ्याचा काटा अडकला, भगवा फडकला’
‘घडाळ्याचा काटा अडकला, भगवा फडकला’
See all

दादर - राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा पुतण्या संदीप तटकरे यांनी रविवारी शिवसेनेत प्रवेश केलाय. संदीप तटकरे हे सुनील तटकरेंचे बंधू अनिल तटकरेंचे सुपुत्र आहेत. दादरच्या शिवसेनाभवनात संदीप तटकरेंनी शिवसेनेत प्रवेश केलाय. यावेळी केंद्रीय मंत्री अनंत गिते, आमदार भरत गोगावले आणि शिवसेना सचिव आदेश बांदेकर उपस्थित होते. संदीप तटकरेंचा शिवसेना प्रवेश रोह्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जातोय.

‘मी नगराध्यक्ष पदासाठी तिकीटाची मागणी केली. पण नगराध्यक्ष पद कोणाला द्यावं हा प्रदेशाध्यक्षांचा अधिकार आहे. शिवसेनेत प्रवेश हा वैयक्तीक निर्णय आहे. राष्ट्रवादीमध्ये आपल्याकडे कोणतंही पद नव्हतं. त्यामुळे हे माझं राजकारणातलं पदार्पण आहे. मला काकांना कोणताही संदेश द्यायचा नाही. मी छोटा कार्यकर्ता आहे’, असं स्पष्टीकरण संदीप तटकरे यांनी दिलं.

Loading Comments