काँग्रेस कार्यकर्त्यांचा रास्तारोको


  • काँग्रेस कार्यकर्त्यांचा रास्तारोको
  • काँग्रेस कार्यकर्त्यांचा रास्तारोको
SHARE

आझाद मैदान - मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी बुधवारी मुंबई पत्रकार संघाबाहेरचा रस्ता रोखून धरला. वन रँक वन पेन्शन योजनेतील काही नियमांविरोधात एका माजी सैनिकानं आत्महत्या केली होती. त्या सैनिकाच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी बुधवारी दिल्ली येथील राम मनोहर लोहिया रुग्णालयात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी प्रवेश केला. त्यावेळी दिल्ली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. त्याच्या निषेधार्थ हा रास्ता रोको करत कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फोटोही जाळण्याचा प्रयत्न केला.

संबंधित विषय
ताज्या बातम्या