आरोपांचं 'निरूपण' !

  Mazagaon
  आरोपांचं 'निरूपण' !
  मुंबई  -  

  भायखळा - 26 सप्टेंबरच्या रात्री रिझवानचा खड्ड्यात बाईक घसरुन अपघात झाला. त्याच्या मृत्यूला शिवसेना आणि भाजप जबाबदार आहे असं वक्तव्य मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आहे. संजय निरुपम यांच्या अध्यक्षतेखाली जे.जे मार्ग पोलीस स्टेशनवर मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. पालिकेचे आयुक्त,महापौर, आणि स्थायी समिती अध्यक्ष तसंच रस्ते इंजिनिअर, ठेकेदार यांच्यावर एफआयआर दाखल करुन अटक करा अशी मागणी त्यांनी केली. मात्र पोलिसांनी एफआयआर दाखल करुन घेतली नाही. त्यामुळे पुढच्या 48 तासात कारवाई केली नाही, तर पोलीस स्टेशनवर धडक मोर्चा काढू असा इशारा निरुपम यांनी दिला.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.