वयासोबत परिपक्वता वाढावी या राऊतांना शुभेच्छा – आशीष शेलार

ठाकरे-मोदींमध्ये विसंवाद घडवणारेच दररोज टिव्हीवर दिसत आहेत. बाळासाहेबांच्या प्रेमापोटीच मोदी हे मातोश्रीवर जायचे.

SHARE

सत्तास्थापनेवरून शिवसेनेच्या हालचालींवर लक्ष ठेवून असलेल्या भाजपने आता मौन सोडले आहे. भाजप आमदार आशिष शेलार यांनी शुक्रवारी सकाळी पत्रकार परिषद घेत, शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला. त्यावेळी शेलारांनी शिवसेनेसाठी सत्तेची गणित जुळवणाऱ्या खासदार संजय राऊतांची वयासोबत परिपक्वता वाढावी या राऊतांना शुभेच्छा देत, टोला लगावला.

भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्रेम असणाऱ्या संजय राऊतांना नरेंद्र मोदी ही व्यक्ती बहुदा समजली नाही. मोदी – अमित शहा यांना समजण्यासाठी संजय राऊतांना बरेच जन्म घ्यावे लागतील. त्यामुळे मोदींवरील प्रेम हे स्वार्थी की निस्वार्थी हेच कळतच नाही. ठाकरे-मोदींमध्ये विसंवाद घडवणारेच दररोज टिव्हीवर दिसत आहेत. बाळासाहेबांच्या प्रेमापोटीच मोदी हे मातोश्रीवर जायचे.  त्यामुळे वाढत्या वयासोबत परिपक्वता वाढायला हवी अशी टिका शेलार यांनी राऊतांवर नाव न घेता केली. ‘राजकीय स्वार्थासाठी असत्य पसरवणं हे भाजपला मान्य नाही. सत्तेच्या लालसेपोटी हाॅटेलमध्ये जातात. सत्तास्थापनेच्या या तीन अंकी नाटकावर भाजप आधीपासूनच लक्ष ठेवून असल्याचे शेलारांनी पत्रकार परिषदेत सांगितले.संबंधित विषय
ताज्या बातम्या