Advertisement

मुंबई महापालिकेवर शिवसेनेचीच सत्ता राहणार - संजय राऊत

भाजपाच्या ४ राज्यातील विजयावर शिवसेना खासदार संजय राऊत निशाणा साधला आहे.

मुंबई महापालिकेवर शिवसेनेचीच सत्ता राहणार - संजय राऊत
SHARES

उत्तर प्रदेशासह ४ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल गुरूवारी लागले. या निकालांनुसार, पंजाबमध्ये आम आदमी पार्टी (आप)ची सत्ता आली असून, उर्वरित ४ राज्यांत भाजपाची सत्ता आली आहे. त्यामुळं ठिक-ठिकाणी भाजपाचे कार्यकर्ते विजय साजरा करताना पाहयला मिळत आहेत. मात्र, भाजपाच्या या विजयावर शिवसेना खासदार संजय राऊत निशाणा साधला आहे.  

या निकालावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. त्यावेळी ‘या विजयाचा आणि मुंबई महापालिकेचा काहीही संबंध नाही. मुंबई महापालिकेवर याआधी शिवसेनेची सत्ता होती, यापुढेही शिवसेनेचीच सत्ता असेल’, असं संजय राऊत यांनी म्हटलं.

या ५ राज्यांचा येणाऱ्या पालिका निवडणुकीवर परिणाम होईल का? असा प्रश्न विचारण्यात आला असता, राऊत म्हणाले की, 'या राज्यांचा आणि मुंबई पालिकाचा काहीही संबंध नाही. गेल्यावेळेस पश्चिम बंगाल निवडणुकांच्या वेळेसही असेच बोलत होते. पण, त्याचा इथे काहीही परिणाम होणार नाही. मुंबई महापालिकेवर आमची सत्ता होती आणि पुढेही राहणार.'

'काल शरद पवार साहेब होते, आम्ही तयार आहोत. आज मीही बोलतोय, जे करायचे ते करा. हे काय करतील, अजून रेड टाकतील, गुन्हे दाखल करतील. यांना दुसरं काही येत नाही. केंद्रीय तपास यंत्रणांचा चुकीच्या पद्दतीने वापर केला जातोय. एकाच आघाडीचे लोक टार्गेट केले जातायत. तपास यंत्रणेवर राजकीय तबाव आणला जातोय. राजकीय कारणांसाठीच आमच्यावर हल्ले होताहेत.  मी हे आता बोलतोय, दहा मिनिटांनी माझ्या घरावर धाड पडू शकते. पण, त्यांनी धाडी टाकाव्यात, मी कुणालाही घाबरत नाही,' असा इशाराही राऊतांनी दिला.

'उत्तर प्रदेशात आम्हाला मोठा पाठिंबा नाही, आमच्या उमेदवाराला कमी मतदान झाल्यामुळे तुम्ही आम्हाला टोला मारता. पण, युआमच्यापेक्षा तुमचे वाईट हाल पंजाबमध्ये झाले आहेत. तिकडे तुमच्याही उमेदवारांना विजय मिळवता आला नाही,' असंही राऊत म्हणाले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा