शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने (ED) नोटीस पाठवल्यानंतर राजकारण चांगलंच तापलेलं आहे. विशाखा राऊत यांना ED ने २९ तारखेला चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहे. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी ही नोटीस देण्यात आली आहे. यांसदर्भात संजय राऊत यांना विचारला असता या प्रकरणाची माहिती घेऊन पत्रकार परिषद घेऊन प्रतिक्रिया देईल, असे संजय राऊत म्हणाले होते.
हेही वाचाः- अॅमेझॉनला धडा शिकवला; 'त्या' मनसे नेत्याकडून कार्यकर्त्यांचं अभिनंदन
पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरणी काही संशयित बँक व्यवहार आहेत त्यांची पडताळणी करण्यासाठी राऊत यांची चौकशी करणार आहे, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. कलम ६७ अंतर्गत ही नोटीस बजावण्यात आलेली आहे. त्यामुळे आता वर्षा राऊत यांना ईडीच्या चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून काहीजणांची चौकशी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर एका जुन्या प्रकरणाच्या चौकशीत वर्षा राऊत यांचं नाव समोर आल्याने, त्यांना समन्स बजावण्यात आलेलं आहे.
— Sanjay Raut (@rautsanjay61) December 27, 2020
या नोटीसीनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला ट्विटरहून थेट आवाहन दिलं आहे. राऊत यांनी ‘आ देखे जरा किसमे है! कितना दम, जमके रखना कदम मेरे साथीया..! अशा आशयाचे ट्विट केलं आहे. संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांना काही दिवसांपूर्वी ईडीने अटक केली होती. वर्षा राऊत यांच्या खात्यात प्रवीण राऊत यांच्या खात्यात काही प्रकारचे व्यवहार झाले आहेत. हा व्यवहार कसा झाला? त्यामागील कारण काय आहे? हे ईडीला जाणून घ्यायचे आहे. वर्षा राऊत यांना संपूर्ण माहिती गोळा करण्यासाठी बोलावण्यात आले आहे, अशी माहिती मिळत आहे. या अगोदर महाविकासआघाडीच्या नेत्यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलेलं आहे. त्यावरून संजय राऊत यांनी भाजपावर जोरदार टीका केलेली आहे. आता त्यांच्या पत्नीला ईडीची नोटीस आल्याने, संजय राऊत नेमकी कशी भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे.