राज ठाकरे यांचा भाजपाला टोमणा

 Pali Hill
राज ठाकरे यांचा भाजपाला टोमणा
राज ठाकरे यांचा भाजपाला टोमणा
राज ठाकरे यांचा भाजपाला टोमणा
See all

दादर - राज्यातल्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या निकालानंतर भाजपाच्या विजयाबद्दल प्रतिक्रिया देताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपावर चांगलीच टीका केली. 'हा नोटबंदीचा विजय नसून, जुन्या नोटांचा विजय अाहे,' अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिलीये.

राज्यात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचं कमळ फुललंय. नोटबंदीच्या निर्णयानंतर भाजपाला याचा फटका बसेल, असा अंदाज व्यक्त होत होता. राज्यातल्या २२ नगरपालिकांवर भाजपानं झेंडा फडकवला आहे, तर एकूण ५१ ठिकाणी भाजपा नगराध्यक्ष निवडून आले आहेत.

या अगोदर, जेव्हा नोटबंदीच्या निर्णयाची घोषणा झाली, तेव्हाही राज ठाकरे यांनी भाजपा निवडणुकीमध्ये 'आपट्याची पानं' वाटणार आहे का, अशी टीका केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी भाजपावर तोंडसुख घेतलंय.

Loading Comments