निवडणूक आयोगानेच वाढवला घोळ

  Mumbai
  निवडणूक आयोगानेच वाढवला घोळ
  मुंबई  -  

  मुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीतील मतदानात झालेल्या मतदार यादीतील घोळाला खुद्द निवडणूक आयोगच जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. महापालिका निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या मतदार यादीच्या आधारेच महापालिका निवडणूक मतदार यादया बनवल्या. त्यातच मतदार याद्या बनवल्यानंतर राजकीय पक्षांना अभ्यास करण्याची वेळ न देता अंतिम याद्या बनवण्यात आल्या आहेत. त्यामुळेच मतदार यादीतील अनेकांची नावे गायब होऊन त्यांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. या घोळाला निवडणूक आयोगच जबाबदारच असल्याचे बोलले जात आहे.

  महापालिका निवडणुकीत तब्बल ५५ .५३ एवढे मतदान झाले. मागील महापालिका निवडणुकीत मुंबईत ४४.७५ टक्के एवढे मतदान झाले होते. परंतु आता या मतदानाच्या टक्केवारीत ११ टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे मागील २५ वर्षांतील हे सर्वात विक्रमी मतदान असल्याचे बोलले जात आहे. मागील महापालिका निवडणुकीत ४४.७५ टक्के एवढे मतदान झाले होते. परंतु मागील महापालिका निवडणूक आणि मागील विधानसभेची निवडणूक यामधील मतदारांची संख्या यंदाच्या महापालिका निवडणुकीत कमी झाल्यामुळे मतदानाच्या टक्केवारीचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत आहेत. प्रत्यक्षात हे प्रमाण कमी झालेल्या मतदानाच्या तुलनेत कमी असून, यावेळी युती आणि आघाडीचे दोन्ही पक्ष स्वतंत्र लढल्यामुळे त्यांच्यासाठी मतदार बाहेर पडल्याचे पाहायला मिळत असल्याचे बोलले जात आहे.

  सर्वाधिक मतदान
  मुंबईतील आर-मध्य विभाग कार्यालयाच्या हद्दीतील बोरीवली भागात सर्वांधिक म्हणजेच ६१.५ टक्के एवढे मतदान झाले आहे. तर दहिसरमधील आर-उत्तर विभागात आणि अंधेरी पूर्व भागात ६० टक्के एवढे मतदान झाले आहे तर सर्वाधिक कमी मतदान कुलाबा ते भायखळ्यादरम्यान झाले आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.