संचलनात राज्य निवडणूक आयोगाचा चित्ररथ

 Pali Hill
संचलनात राज्य निवडणूक आयोगाचा चित्ररथ
संचलनात राज्य निवडणूक आयोगाचा चित्ररथ
See all

दादर - शिवाजी पार्कवर 26 जानेवारी 2017 रोजी प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनात राज्य निवडणूक आयोगाच्या चित्ररथाचा प्रथमच समावेश केला जाणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांच्या हस्ते या चित्ररथाच्या प्रतिकृतीचं बुधवारी अनावरण करण्यात आलं. 73 आणि 74 व्या घटना दुरुस्तीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांना बळकटी मिळाली आणि त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाचीही स्थापना करण्यात आली. शिवाय आता बृहन्मुंबईसह 10 महानगरपालिका, 26 जिल्हा परिषद आणि 296 पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर हा चित्ररथ तयार करण्यात येत आहे. चित्ररथाची संकल्पना जे. जे. कला महाविद्यालयाची असून तेच त्याची निर्मितीही करणार आहेत. चित्ररथाच्या प्रथम दर्शनी भागावर उडत्या श्वेत अश्वाचे शिल्प असेल. चित्ररथाच्या मध्यभागी महानगरपालिका, नगरपरिषदा, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींच्या प्रातिनिधीक स्वरूपात इमारती दर्शविल्या जातील.

Loading Comments