पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमाला कडेकोट बंदोबस्त

  Pali Hill
  पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमाला कडेकोट बंदोबस्त
  मुंबई  -  

  मुंबई - शिवस्मारकाचे भूमिपूजन तसेच वांद्रे येथील बीकेसी परिसरातील असलेल्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे इथे कोणताही अनुसुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबई पोलिसांनी तीन स्तरीय बंदोबस्त लावला आहे.

  राज्य राखीव दल, तसेच केंद्रीय औद्योगिक दलासह मुंबई पोलिसांचे 10 हजार कर्मचारी तैनात करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. राम मंदिर रेल्वे स्थानकाच्या उद्घाटनप्रसंगी भाजपा-शिवसेना कार्यकर्ते आमने-सामने येऊन गोंधळ उडाला होता. यामुळे सतर्क झालेल्या पोलिसांनी असा कोणताही प्रकार घडू नये याकरीता फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. गिरगाव येथील भूमिपूजनाचा कार्यक्रम संपल्यानंतर बीकेसी येथे जाण्यासाठी वाहतूकीचा बोजवारा उडू नये,यासाठी वाहतूक पोलिसांचे 3 हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.