श्रेयवादावरून शिवसेना-भाजपा आमने-सामने

  मुंबई  -  

  बोरीवली - भाजपा आणि शिवसेनेमधील वाद काही नवा नाही. मात्र पालिका निवडणूक जवळ आल्यानं हे वाद पुन्हा उफाळून आलेत आणि एवढे वाढलेत की स्थानिक पातळीवर देखील त्याचे पडसाद उमटू लागलेत. याचाचं प्रत्यय पहायला मिळालंय बोरिवलीमध्ये पालिकेच्या शताब्दी रुग्णालयाच्या नामकरण आणि भूमिपूजनाच्यावेळी. या रुग्णालयाच्या 11 व्या मजल्याचे भूमिपूजन भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी एकाच दिवशी केलंय.

  दोन्ही पक्ष राजकीय श्रेय घेण्याचा आतोनात प्रयत्न करत आहेत. यापुढेही पालिका निवडणूक होईपर्यंत या दोन्ही पक्षांमध्ये श्रेयवादाची लढाई सर्वाधिक पाहायला मिळणार आहे. मात्र सूज्ञ मतदार राजा कुणाला कौल देईल याचं उत्तर पालिका निवडणुकीच्या निकालानंतर कळेल.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.