Advertisement

भाइयों किंवा मित्रो म्हणायला भीती वाटते - उद्धव ठाकरे


भाइयों किंवा मित्रो म्हणायला भीती वाटते - उद्धव ठाकरे
SHARES

नरिमन पॉईंट - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर उपहासात्मक टीका केलीय. "आता भाइयों किंवा मित्रो म्हणायला भीती वाटते. लोकं निघून जातात म्हणून मी देवीओ और सज्जनो म्हणतो," असे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे म्हणाले. आधीच्या एका भाषणाचा दाखला देत ते बोलले की, बिट्टुजी तुम्ही काय म्हणालात? हल्ली कोणाचं ऐकावं लागतं. चहा वाल्याच ऐकावं लागतं असं म्हणालात ना? अशी उपहासात्मक टीका उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली. प्रितिश नंदी यांच्या रोअर पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं.

"विकास तर हवाच पण तो करत असताना निसर्ग सांभाळायला हवा, मेट्रो कारशेडच्या बाबतीत पण हेच आहे. त्यासाठी झाड तोडण्यात येणार आहेत," असा टोला ठाकरे यांनी भाजपाला लगावला. तसेच "महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागताच २३ फेब्रुवारीला मुंबईकर भगवा विजयोत्सव साजरा करणार," असा आत्मविश्वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा