उर्दू माध्यमाच्या विद्यार्थिनींना टॅब वाटप

 Kurla
उर्दू माध्यमाच्या विद्यार्थिनींना टॅब वाटप
उर्दू माध्यमाच्या विद्यार्थिनींना टॅब वाटप
See all
Kurla, Mumbai  -  

कुर्ला - अंजुमन-ए-इस्लाम सैफ तय्यबजी गर्ल हायस्कुलमधल्या विद्यार्थिनींना शिवसेनेकडून मोफत टॅबचं वाटप करण्यात आलं. आठवीच्या २०० विद्यार्थिनींना शिवसेनेच्या वतीनं मोफत वाटप करण्यात आलं. मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.

या वेळी शिवसेना उपनेते हाजी अरफात शेख, अंजुमन-ए-इस्लाम शैक्षणिक संस्थेचे विश्वस्त डॉ.झहीर काझी, उद्योजक सोहेल खंडवाणी यांच्या हस्ते या टॅबचे वितरण करण्यात आले. यावेळी शैक्षणिक क्षेत्रात आपल्या योगदानाद्वारे उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या उर्दू माध्यमातील शिक्षकांचाही गौरव करण्यात आला.

Loading Comments